Homeमहत्त्वाचेपुणे-दौंड-बारामती रेल्वे प्रवाशांना दिलासा; आमदार राहुल कुल यांची DRM कडे ठोस मागणी

पुणे-दौंड-बारामती रेल्वे प्रवाशांना दिलासा; आमदार राहुल कुल यांची DRM कडे ठोस मागणी

वृत्तवेध मarathi | संदिप बारटक्के 

दौंड आणि बारामती रेल्वे मार्गावरील लाखो प्रवाशांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार राहुल कुल यांनी पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांची भेट घेत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. या बैठकीत प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी सध्या सुरू असलेल्या DMU गाड्यांच्या ऐवजी पुणे-दौंड व पुढे लोणावळ्यापर्यंत EMU लोकल सेवा सुरू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. दौंड शहराला ‘उपनगर’ दर्जा देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्र्यांना याबाबत पत्र दिल्याची माहिती आमदार कुल यांनी दिली.

महिला व दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र डबे तातडीने सुरू करून अधिकृत घोषणा करावी, अशी मागणीही करण्यात आली. सकाळी ८:२५ ते सायंकाळी ५:०० या गर्दीच्या वेळेत दौंड-पुणे दरम्यान अतिरिक्त लोकल सुरू करण्याचा आग्रह त्यांनी धरला. अन्यथा पर्यायी रेल्वे मार्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले.

हडपसर-यवत उड्डाणपुलाच्या आगामी कामामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता लक्षात घेता, रेल्वे फेऱ्या वाढवून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी आग्रही भूमिका बैठकीत मांडण्यात आली. तसेच पुणे, दौंड आणि बारामती मार्गावरील गाड्या वेळेत धावाव्यात आणि एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे वाढवावेत, यावरही चर्चा झाली.

मुंढवा व हडपसर येथे थांबणाऱ्या काही गाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे स्टेशनपर्यंत वाढवाव्यात, अशी सूचनाही आमदार राहुल कुल यांनी केली.

या सर्व मागण्यांवर पुणे DRM यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रवासी सुरक्षा, आरक्षण सुविधा आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. प्रवाशांच्या हितासाठी हा पाठपुरावा पुढेही सुरू राहील, असा विश्वास आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

error: Content is protected !!