Homeमहत्त्वाचेदौंडकरांच्या सुट्ट्या पैशांच्या समस्येला मिळणार दिलासा?; नगरसेविका रुचिता रुपेश कटारिया व व्यापाऱ्यांचे...

दौंडकरांच्या सुट्ट्या पैशांच्या समस्येला मिळणार दिलासा?; नगरसेविका रुचिता रुपेश कटारिया व व्यापाऱ्यांचे स्टेट बँकेला निवेदन

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड शहरातील व्यापारी, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन व्यवहारांसाठी १, २, ५, १० व २० रुपयांच्या चलनी नोटा आणि नाण्यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे. मात्र, गेल्या काही काळापासून सुट्ट्या पैशांच्या कमतरतेमुळे किरकोळ व्यवहार करताना व्यापारी आणि ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून याबाबत सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ही समस्या लक्षात घेऊन आमदार राहुल कुल तसेच माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड नगरपालिकेच्या नगरसेविका रुचिता रुपेश कटारिया आणि शहरातील व्यापारी वर्गाच्या प्रतिनिधींनी आज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दौंड शाखेचे व्यवस्थापक मुबिन खान यांची भेट घेतली.

यावेळी व्यापाऱ्यांनी शहरातील नागरिक व व्यावसायिकांना नियमितपणे सुट्टे चलन उपलब्ध व्हावे यासाठी बँकेने स्वतंत्र आणि सुलभ चलन वितरण व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. किरकोळ व्यवहारांमध्ये सुट्ट्या पैशांचा तुटवडा असल्याने ग्राहक आणि दुकानदार यांच्यात अनेकदा वाद निर्माण होतात. तसेच व्यवसायावरही त्याचा परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेत व्यवस्थापक मुबिन खान यांनी या मागणीची दखल घेतली असून, लवकरच याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल आणि नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना सुट्ट्या चलनाची उपलब्धता सुलभ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

या उपक्रमामुळे दौंड शहरातील व्यापारी वर्ग आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, सुट्ट्या पैशांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!