दौंड ग्रामीण प्रतिनिधी : सुरेश बागल
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. १९. ०२. २०२६ गुरुवार रोजी जि. प. प्राथमिक शाळेसमोर दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कुरकुंभ शिवसेना शाखा प्रमुख नवनाथ कुंभार, ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप शितोळे,भाऊ सोनवणे, दौंड तालुका भाजपा कार्यकर्ते राहुल शितोळे दौंड आर पी आय अध्यक्ष नवनाथ गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी
शिवसेना शाखा कुरकुंभ उपशाखाप्रमुख संतोष मंडले, सचिव सचिन रणवरे, संघटक गणेश राऊत तसेच शिवसैनिक बालाजी सपाटे, योगेश राऊत, विनायक भिंगारे, मोहन अण्णा भोसले, श्याम हंचाटे , कुलदीप भागवत, पत्रकार सुरेश बागल आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज कि जय, ” जय भवानी जय शिवाजी ” अशी घोषणेबाजी करण्यात आली.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















