Homeक्राईमतक्रारी मागे घेण्यासाठी १५ लाखांची मागणी; कुरकुंभ येथील खंडणी प्रकरणात एकास अटक

तक्रारी मागे घेण्यासाठी १५ लाखांची मागणी; कुरकुंभ येथील खंडणी प्रकरणात एकास अटक

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड | तालुक्यातील कुरकुंभ येथे विविध शासकीय कार्यालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारी व अर्ज मागे घेण्यासाठी लाखो रुपयांची मागणी केल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप पोपट भागवत यास पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 414/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 308(2) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी चांगदेव सावता बनकर (वय 47, व्यवसाय – कन्स्ट्रक्शन, रा. कुरकुंभ, ता. दौंड, जि. पुणे) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक मधुकर मुंडलीक यांनी फिर्यादींच्या शस्त्र परवान्यासंदर्भात, इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बांधकामासंदर्भात तसेच इतर विविध विषयांवर अनेक शासकीय कार्यालयांमध्ये तक्रारी अर्ज दाखल केले होते. या तक्रारी मागे घेण्यासाठी आणि प्रकरण मिटविण्यासाठी संदीप पोपट भागवत याने मध्यस्थी करत सुरुवातीला १५ लाख रुपयांची मागणी केली होती.

त्यानंतर विविध बैठका, चर्चा आणि तडजोडीच्या प्रयत्नांद्वारे ही रक्कम ५ ते ६ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. संदीप भागवत याने प्रत्यक्ष भेटी तसेच दूरध्वनीद्वारे वारंवार पैशांची मागणी करत, पैसे दिल्यास शस्त्र परवाना रद्द होणार नाही, इमारतीवरील कारवाई थांबेल, न्यायालयीन व शासकीय तक्रारी मागे घेतल्या जातील आणि भविष्यात कोणताही त्रास होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन दिल्याचा आरोप आहे.

फिर्यादी चांगदेव बनकर यांना यामागे संदीप भागवत व दीपक मुंडलीक यांचे संगनमत असल्याचा संशय आला. विविध तक्रारी आणि अर्जांचा आधार घेऊन आपल्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पोलीस हवालदार नितीन चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, आरोपी संदीप पोपट भागवत यास पोलिसांनी रात्री अटक केली असून, दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

3 अटक, पुणे ग्रामीण पोलिसांनी 20 गुन्हे उघडकीस आणले

पुणे ग्रामीण पोलिसांनी घरफोड्या, दरोडे आणि दरोड्याचे 20 गुन्हे उघडकीस आणून अटक केली, तर आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि एक मोटारसायकल असा २५ लाखांचा...

जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर एमबीबीएस; कु. नेहा रामचंद्र सोनोने यांचा नगरसेविका स्वाती सावंत...

  वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के दौंड | वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी एमबीबीएस पदवी यशस्वीरीत्या संपादन करून कुटुंबासह दौंड शहराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कु....

सेना (UBT) दोन खासदारांना मागे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे

सेनेचे (UBT) आमदार अंबादास दानवे आणि आमदार कैलास पाटील यांना उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि मुंबई ईशान्येचे खासदार संजय दिना पाटील यांच्याशी संपर्क...

FYJC साठी 15L पेक्षा जास्त जागा, 23 जून रोजी तिसरी गुणवत्ता यादी

पुणे : यावर्षी FYJC साठी दुसरी नियमित प्रवेश फेरी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 15,71,662 जागा रिक्त आहेत. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या...

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोसायट्या, मतदान अधिकारी बांधील

पुणे : बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) ला रहिवाशांपर्यंत पोहोचण्यास आणि या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या मतदार यादीच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) मध्ये...

error: Content is protected !!