Homeताज्या बातम्यासह्याद्रीच्या जंगलांवर कुऱ्हाड | भीमाशंकर येथील वृक्षतोडीविरोधात दौंडकरांचा एल्गार; झाडांच्या कत्तलीची पारदर्शक...

सह्याद्रीच्या जंगलांवर कुऱ्हाड | भीमाशंकर येथील वृक्षतोडीविरोधात दौंडकरांचा एल्गार; झाडांच्या कत्तलीची पारदर्शक चौकशी करा

✍️ संदिप बारटक्के

दौंड : विकासाच्या नावाखाली सह्याद्रीच्या हिरव्यागार वनसंपदेवर कुऱ्हाड चालवली जात असेल, तर हा विकास नेमका कोणासाठी, असा संतप्त सवाल उपस्थित करत दौंडमधील वृक्षप्रेमी, निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी आणि जागरूक दौंडकर नागरिकांनी भिमाशंकर येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर आवाज उठवला आहे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर जंगल परिसरातील वृक्षतोडीबाबत तसेच रायगड जिल्ह्यातील कर्जत-सायडोंगर परिसरात टोरंट पॉवर प्रकल्पासाठी वृक्षतोड होत असल्याच्या आलेल्या वृत्तांबाबत चिंता व्यक्त करत संबंधित परवानग्यांची पारदर्शक चौकशी करून वनसंपदा आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्याची मागणी निसर्गप्रेमी व वृक्षप्रेमी दौंडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आली आहे.

भीमाशंकर जंगल परिसरात सुमारे पाच हजार वृक्षांची कत्तल होत असल्याचा दावा समोर आल्याने पर्यावरणप्रेमींनी गंभीर चिंता व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. या वृक्षतोडीबाबत नेमकी किती झाडे तोडण्यात आली आहेत, किती झाडे तोडण्यास प्रस्तावित आहेत, संबंधित प्रकल्पांना कोणत्या विभागाने आणि कोणत्या अटींवर परवानग्या दिल्या आहेत, याची सविस्तर माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कर्जत-सायडोंगर परिसरातील वृक्षतोडीच्या वृत्तांचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी. संबंधित वनविभाग, महसूल विभाग आणि इतर सक्षम प्राधिकरणांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. पर्यावरणाच्या परिणामांचा योग्य अभ्यास न करता तसेच आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याची खात्री न करता कोणतीही वृक्षतोड होऊ नये, अशी भूमिका पर्यावरणप्रेमींनी घेतली आहे.

राज्यात अनेक भागांत पाणीटंचाई आणि अनियमित पावसाची चिंता असताना जंगलांचे महत्त्व अधिक आहे. वृक्ष मातीची धूप रोखण्यास, पाण्याचे चक्र टिकवण्यास, स्थानिक तापमान नियंत्रित ठेवण्यास आणि वन्यजीवांना अधिवास उपलब्ध करून देण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीचे पर्यावरणावरील परिणाम गांभीर्याने विचार करण्यासारखे आहे.

एका झाडावर कुऱ्हाड पडते, तेव्हा केवळ लाकूड जमिनीवर पडत नाही; पक्ष्यांची घरटी, वन्यजीवांचा निवारा आणि निसर्गाने वर्षानुवर्षे निर्माण केलेली परिसंस्थाही धोक्यात येऊ शकते. अनेक दशकांत विकसित झालेल्या नैसर्गिक जंगलाची जागा काही रोपे लावून तात्काळ भरून काढता येत नाही. त्यामुळे वृक्षतोडीबाबत निर्णय घेताना पर्यावरणीय हानी, जैवविविधता आणि भविष्यातील पिढ्यांचे हित यांचा विचार करणे अत्यावश्यक आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला सह्याद्री हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि नैसर्गिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या पर्वतरांगांतील जंगलसंपदा म्हणजे केवळ हिरवाई नव्हे, तर असंख्य जीवांचे जीवन, निसर्गाचा समतोल आणि भावी पिढ्यांसाठीचे अमूल्य भांडवल आहे.

विकासाला विरोध करणे हा या मागणीचा उद्देश नसून, विकास आणि पर्यावरणसंवर्धन यांच्यात योग्य समतोल राखला जावा, ही भूमिका आहे. प्रकल्पांसाठी वृक्षतोड अपरिहार्य असल्याचा दावा केला जात असेल, तर त्याची गरज, पर्यायी जागांचा विचार, कायदेशीर परवानग्या आणि पर्यावरणीय परिणाम यांची पारदर्शक माहिती नागरिकांसमोर ठेवली पाहिजे.

दौंडकर निसर्गप्रेमींच्या वतीने दौंड तहसीलदार यांना निवेदनाद्वारे या प्रकरणाकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

– भीमाशंकर जंगल परिसरातील सुमारे पाच हजार वृक्षतोडीच्या दाव्याची अधिकृत पडताळणी करावी.

– कर्जत-सायडोंगर परिसरातील वृक्षतोडीबाबत स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी.

∆ विकास हवा, पण निसर्गाच्या विनाशाच्या किंमतीवर नको,,,,

सह्याद्रीचे जंगल वाचवणे ही केवळ पर्यावरणप्रेमींची जबाबदारी नाही, तर शासन, प्रशासन, प्रकल्प यंत्रणा आणि प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आज जंगलांचे संरक्षण करण्यात अपयश आले, तर त्याचे परिणाम पुढील पिढ्यांना भोगावे लागू शकतात. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी ठाम मागणी दौंडकर निसर्गप्रेमी व वृक्षप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक नंदू पवार, माजी नगरसेवक प्रविण परदेशी, आम आदमी पार्टीचे दौंड तालुका प्रमुख रवींद्र जाधव, सचिन गायकवाड, मनीष परकाळे, माधव बागल सर, जाधव सर, उमेश कांचन, दिनेश फराटे, संतोष जगताप, रवींद्र बंड, वैजनाथ जाधव, सतीश पाटील इत्यादी वृक्षप्रेमी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Daund | संस्कार स्कूलमध्ये नवरात्रोत्सवाचा जल्लोष; देवीच्या नऊ रूपांनी वेधले दौंडकरांचे लक्ष|

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : शहरातील संस्कार प्रायमरी अ‍ॅण्ड हायस्कूल येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी दांडिया-गरबा, तसेच...

दौंडच्या मुख्य रस्त्यावर अवजड वाहतुकीचा विळखा; वाहने शहराबाहेरून वळवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील नगरमोरी चौक ते भीमनगर या मुख्य रस्त्यावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत असल्याचा मुद्दा उपस्थित...

वर्षभराचा अंधार दूर | दौंड शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे सुरू; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकांमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने बसविण्यात आलेले पथदिवे गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने...

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

error: Content is protected !!