Homeक्राईमदौंड शहरातील मोकाट जनावरे पकडून गोशाळेत जमा करण्या-कामीच्या ठेक्याचे प्रकरण गंभीर वळणावर.........

दौंड शहरातील मोकाट जनावरे पकडून गोशाळेत जमा करण्या-कामीच्या ठेक्याचे प्रकरण गंभीर वळणावर…… ठेकेदार व नगरपालिका अधिकारी वर्गाच्या संगणमताने सर्वसामान्य जनतेच्या करातून गोळा झालेल्या निधीवर दरोडा—- गोरक्षकांचा आरोप। प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई न झाल्यास उपोषण ,बेमुदत आंदोलनाचा इशारा।

✍️अख्तर काझी

दौंड: शहरामध्ये मोकाट फिरणारी जनावरे (गोवंश) सुरक्षित पद्धतीने पकडून गोशाळेमध्ये संवर्धनासाठी पाठविणे कामीचा ठेका नगरपालिकेच्या वतीने येथील किरण डिस्ट्रीब्युटर्स कंपनीला दि.29 सप्टेंबर 2025 रोजी करारनामा करून देण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने ठेकेदाराने शहरातील मोकाट फिरणारी जनावरे पकडून गो शाळेत जमा करण्याचे कामास सुरुवात केली होती. मात्र या कामामध्ये पकडलेले असंख्य गाय, बैल गो शाळेत जमा न होता गायब झाले असल्याचे गोरक्षकांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी या प्रकरणाची जलद गतीने चौकशी करून संबंधितांवर भारतीय न्यायसंहिताच्या विविध कलमांतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केलेली आहे,

संबंधितांवर कारवाई न झाल्यास दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी पासून दौंड नगरपालिकेच्या कार्यालयासमोर आंदोलन( उपोषण) सुरू करणार असल्याचा इशारा गोरक्षक निखिल स्वामी, अक्षय वाघमारे,आनंद मुनोत, अजय राऊत यांनी दिला आहे.

आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी(पुणे) पोलीस निरीक्षक, दौंड तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाची प्रत पाठविण्यात आलेली आहे.

निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, दौंड नगरपालिकेच्या वतीने शहरातील मोकाट जनावरे( गोवंश) सुरक्षित पद्धतीने पकडून गोशाळेमध्ये संवर्धनासाठी पाठविणे या कामाची निविदा दि.29 सप्टेंबर 2025 रोजी काढण्यात आलेली होती. त्या दिवसापासून दौंड नगरपरिषदेच्या वतीने मोकाट गोवंश पकडण्याचे काम ठेकेदार करीत आहे. संबंधित ठेकेदाराने वेळोवेळी शहरातील पकडलेले गोवंश जिओ टॅग फोटो काढून पुढे श्री बोरमलनाथ गोशाळा ट्रस्ट कडे संवर्धनासाठी पाठविणे आवश्यक होते. सदर गोवंश पकडल्यापासून ते गोशाळेत सोडेपर्यंत नगरपालिकेचे जबाबदार अधिकारी प्रत्येक वेळी हजर राहणे आवश्यक होते. मात्र या पद्धतीने काम न करता नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदर कामात हलगर्जीपणा केल्याचे दिसून येत आहे. संबंधित ठेकेदार यांनी नगरपालिकेबरोबर केलेल्या करारानुसार व त्यांनी सादर केलेल्या पत्रानुसार तसेच दौंड पोलीस स्टेशन यांच्याकडे वाहतूक परवान्यानुसार पकडलेले गोवंश( गाय, बैल) श्री बोरमलनाथ गोशाळा ट्रस्ट या गोशाळेत सोडून तेथील जिओ टॅग फोटो सादर करणे गरजेचे होते. मात्र नगर पालिका प्रशासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अस्तित्वातच नसलेल्या गो शाळेत पकडलेले गोवंश सोडल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असून सदर प्रकरणाचे संपूर्ण बिल( रक्कम) आरोग्य विभागातील कर्मचारी व मुख्याधिकारी यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्याचा प्रकार समोर येत आहे. मुख्याधिकारी ,आरोग्य कर्मचारी व ठेकेदार यांनी संगनमत करून सर्वसामान्य जनतेच्या करातून गोळा झालेल्या निधीवर दरोडा टाकला आहे असा आरोप गोरक्षकांच्या वतीने करण्यात आला आहे.

श्री बोरमलनाथ गोशाळे व्यतिरिक्त गो शाळेत गाय, बैल दिल्याचे दाखले ठेकेदाराने नगरपालिकेकडे सादर केले त्यावेळेसच नगरपालिका प्रशासनाने सदर गोशाळा अस्तित्वात आहे का? चालू स्थितीत आहे का? असल्यास शासनाच्या सर्व परवानग्या गोशाळेकडे आहेत का? दरवर्षी या गोशाळेचे लेखापरीक्षण होते आहे का? या बाबी तपासता मुख्याधिकारी यांनी संबंधित ठेकेदाराला वेळीच समज देणे गरजेचे होते. याउलट कोणत्याही प्रकारची शहनिशा अथवा खात्री न करता बेकायदेशीरपणे गाय, बैल इतरत्र पाठविण्यास संबंधित ठेकेदाराला पाठबळ दिले आहे, त्यामुळे ठेकेदार ,मुख्याधिकारी ,आरोग्य कर्मचारी यांनी संगनमताने शहरातील पकडलेले गाई ,बैल गो शाळेत न पाठवता इतरत्र पाठविलेले सिद्ध होत आहे.

शहरात पकडलेली जनावरे गो शाळेत न जाता त्यांची परस्पर बाहेर विक्री केली जात असल्याची माहिती गोरक्षक निखिल स्वामी, अक्षय वाघमारे यांनी नगरपालिकेला दिलेली होती व नगरपालिकेने संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणीही केलेली होती. मात्र या गंभीर बाबीकडे दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. तर तक्रारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ठेकेदाराला लाखोंची बिले अदा करण्यात आली आहे अशी माहिती निवेदनातून देण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित ठेकेदार, मुख्याधिकारी व आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्यावर दि.10 ऑगस्ट 2026 पूर्वी गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा 13 ऑगस्ट 2026 रोजी पासुन बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आंदोलकांनी निवेदनातून दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

अति उत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा लोहमार्ग पोलीस प्रशासनाच्या...

  ✍️ अख्तर काझी दौंड: भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावताना उल्लेखनीय कामगिरी, उत्कृष्ट सेवा, शिस्त,कार्य तत्परता आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अधिकारी...

गवळवाडी येथे मोफत रक्तगट व नेत्र तपासणीसह रक्तदान शिबिर

  पवन साळवे गवळवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गवळवाडी येथे डॉ. अमृता सूरज चवंडके व चवंडके परिवाराच्या वतीने मोफत रक्तगट तपासणी, नेत्र तपासणी आणि रक्तदान...

error: Content is protected !!