Homeशिक्षण-प्रशिक्षण“संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचा संगम; दौंड येथील श्री मंगेश मेमोरियल स्कूलचा २३वा...

“संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचा संगम; दौंड येथील श्री मंगेश मेमोरियल स्कूलचा २३वा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न”

दौंड — दौंड येथील श्री मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज या संस्थेचा २३ वा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात व दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात संस्थेतील विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्यांची जपणूक करत विविध कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

नर्सरी ते युकेजी वर्गातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आदर्श पालकत्व व आदर्श विद्यार्थी या विषयावर आधारित संदेशमय नाटक सादर करून उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना प्रभावी संदेश दिला. या सादरीकरणाचे नियोजन सौ. निशिगंधा गुंजकर जांभळे यांनी त्यांच्या शिक्षक सहकाऱ्यांसह केले.

इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित ‘कृष्ण लीला’ सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. यासाठी वर्ग शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तर इयत्ता चौथी ते दहावीच्या जवळपास 300 विद्यार्थ्यांनी भगवान श्रीरामांच्या जीवनावर आधारित ‘रामकथा’ सादर केली. प्रभू श्रीरामांच्या जन्मापासून ते रावणवध व अयोध्येत पुनरागमनापर्यंतचा संपूर्ण जीवनप्रवास या नाटकातून प्रभावीपणे उलगडण्यात आला. या सादरीकरणात सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र येऊन उल्लेखनीय कामगिरी केली.

या संपूर्ण कार्यक्रमास पालकांचे मोलाचे सहकार्य तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले. या स्नेहसंमेलनाची संकल्पना श्रीमती शिल्पा वर्मा यांच्या विचारातून साकार झाली असून विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांची त्याला भक्कम साथ मिळाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्रीमती शिल्पा वर्मा यांनी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमास संस्थेच्या उपसंचालिका श्रीमती प्रतिमा लहरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी रवी बॅस्टीयन, प्राचार्य गिरीश सुरवाडे, मुख्याध्यापिका सौ. राजश्री भोसले तसेच कार्यालयीन कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. भविष्यातही श्री मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांस्कृतिक कला, परंपरा आणि मूल्यांचा वारसा जपत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करत राहील, अशी ग्वाही श्रीमती शिल्पा वर्मा यांनी दिली.

मंगेश मेमोरियल हायस्कूलच्या ३०० विद्यार्थ्यांनी भगवान श्रीरामाच्या जीवनावर आधारित रामकथा सादर केल्यामुळे आमदार राहुल कुल यांनी कौतुक करून शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी बॅस्टीयन व सुरजसिंह परदेशी यांचा सत्कार केला.

यावेळी आमदार राहुल कुल, सतीश थोरात, राहुल हंडाळ, बापू भागवत, भाजप दौंड शहर अध्यक्ष रितेश ओझा उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

error: Content is protected !!