Homeराजकीयदौंडला मिळाले जिल्हा परिषद अध्यक्षपद; विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात, नगरसेविका स्वाती निलेश...

दौंडला मिळाले जिल्हा परिषद अध्यक्षपद; विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात, नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी व्यक्त केला विश्वास

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे-पाटील यांची निवड झाल्याने दौंड तालुक्याच्या राजकीय आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासाच्या अपेक्षांना आता नवी दिशा मिळणार असल्याची भावना दौंड शहरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

यापूर्वी “बारामती झकास, दौंड भकास” अशी टीका वारंवार ऐकायला मिळत होती. मात्र, आत्ता परिस्थिती बदलण्याची चिन्हे दिसत असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडचे सुपुत्र वीरधवल जगदाळे-पाटील यांच्या नेतृत्वात दौंड तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

याबाबत बोलताना नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी सांगितले की, “दौंडला प्रथमच अशा महत्त्वाच्या पदावर प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यामुळे केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक आणि पायाभूत विकासालाही चालना मिळेल. आता ‘बारामती झकास आणि दौंड भकास’ ही म्हण बदलून ‘बारामती झकास आणि दौंड पण झकास’ अशी होईल, याबद्दल आम्ही आशावादी आहोत.”
तसेच, या निवडीमुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली. दौंड तालुक्याच्या विकासासाठी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करतील, अशीही प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे.
एकूणच, वीरधवल जगदाळे-पाटील यांच्या निवडीमुळे दौंडच्या विकासाला नवे बळ मिळणार असून, तालुक्याची ओळख बदलण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

error: Content is protected !!