Homeराजकीयदौंडच्या विकासकामांना राजकारण्यांचा अडथळा; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांचा विरोधकांवर थेट हल्ला

दौंडच्या विकासकामांना राजकारण्यांचा अडथळा; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांचा विरोधकांवर थेट हल्ला

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड : नगरपालिकेमार्फत शहरात विविध विकासकामे वेगाने सुरू असतानाच या कामांमध्ये विरोधकांकडून अडथळे आणले जात असल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांनी केला आहे. मंगळवारी (दि. १४) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत शहराच्या विकासात राजकारण होत असल्याची खंत व्यक्त केली.

शहरातील विकासकामे चुकीच्या पद्धतीने व मनमानी कारभारातून केली जात असल्याचा आरोप नागरिक हित संरक्षण मंडळाच्या नगरसेवकांनी करत जिल्हाधिकारी कार्यालय व बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काही कामे थांबवण्याचे आदेश नगरपालिकेला मिळाले. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ५ च्या हद्दीत रस्त्यालगत झाडेझुडपे हटवण्याचे काम सुरू असताना त्यातही राजकारण करून ते काम बंद पाडले आल्याचा आरोप त्यांनी केला. “दौंडच्या विकासात अडथळे आणण्यासाठी विरोधक जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यावरही आरोप करत सांगितले की, “मुख्याधिकारी ठराविक गटाच्या सांगण्यावरून काम करत आहेत. नगराध्यक्ष म्हणून दिलेल्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसत आहे.”

कचरा व्यवस्थापनाचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. “सध्या दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे १७ टन कचऱ्यासाठी दौंड नगरपालिका स्वतःची जागा घेऊन योग्य व्यवस्था करणार आहे,” असे नगराध्यक्षा जगदाळे -पाटील यांनी नमूद केले.

तसेच नगरपालिकेचा एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया) प्रकल्प बंद असून, तेथील लाखो रुपयांची यंत्रसामग्री चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि बांधकाम यांसारख्या मूलभूत सुविधांवर प्राधान्याने काम सुरू असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे अधोरेखित केले.

“आमचा एकच उद्देश आहे — दौंड शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांचे कल्याण. विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून विकासकामांना सहकार्य करावे. अन्यथा, नगराध्यक्ष म्हणून मला दिलेले अधिकार वापरण्यास मी मागे हटणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

error: Content is protected !!