Homeक्राईमदौंड पोलिसांची धडक कारवाई ! ५२ किलो गांजा जप्त; थरारक पाठलागानंतर आरोपीला...

दौंड पोलिसांची धडक कारवाई ! ५२ किलो गांजा जप्त; थरारक पाठलागानंतर आरोपीला अटक

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड : अमली पदार्थांच्या विरोधात दौंड पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ५२ किलो ३० ग्रॅम गांजा जप्त केला असून एका आरोपीस अटक केली आहे. या कारवाईमुळे दौंड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, MP 09 AT 2117 क्रमांकाच्या कारमधून काही इसम बेकायदेशीररीत्या अहिल्यानगरकडून साताऱ्याकडे गांजा घेऊन वाहतूक करणार आहेत.

या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी तात्काळ पोलीस पथक तयार करून दौंड-पाटस रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान संशयित कार दिसताच पोलिसांनी चालकाला गाडी थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने पोलिसांचा इशारा धुडकावून लावत बॅरिकेट्सला चकवा देत पळ काढण्याचा प्रयत्न केला.

यावेळी आरोपीने पुढे असलेल्या MP 13 ZV 8824 या वाहनाला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत पाठलाग करून वाहन अडवले व चालकाला ताब्यात घेतले.

चौकशी केली असता आरोपीचे नाव मुकेश धर्मिया कणोजे (वय ३६ वर्षे, रा. बलवाडी, ता. बडवानी, मध्यप्रदेश) असे असल्याचे समोर आले. त्याच्या ताब्यातील कारची झडती घेतली असता, ५ प्लास्टिक पॅकेट्समध्ये चिकटपट्टीने गुंडाळलेला एकूण ५२ किलो ३० ग्रॅम गांजा आढळून आला. या गांज्याची बाजारातील अंदाजे किंमत १३ लाख ७ हजार ५०० रुपये इतकी आहे.

जप्त मुद्देमाल:
५२ किलो ३० ग्रॅम गांजा – ₹१३,०७,५००
किया सोनेट कार (MP 09 AT 2117) – ₹१०,००,०००

या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशनमध्ये गु.र. नं. २५६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८ (c), २० (B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पो.स.ई. रुपेश कदम, चौधरी, साळुंखे तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

या यशस्वी कारवाईमुळे दौंड पोलिसांनी अमली पदार्थांच्या विरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून गुन्हेगारीविरोधातील त्यांची सजगता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

error: Content is protected !!