वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक १४ एप्रिल सकाळी ९ वाजता भिमकन्या रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यंदा या रॅलीला सहा वर्षे पूर्ण झाल्याने उत्साह दुपटीने वाढलेला पाहायला मिळाला.
डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करत भिमकन्या रॅली अत्यंत थाटामाटात पार पडली. दौंड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रॅलीला भरघोस प्रतिसाद दिला. शहरातील विविध चौकांमध्ये रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे -पाटील यांनी उपस्थित राहून भिमकन्या रॅलीचे कौतुक केले. तसेच रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला.
या रॅलीचे आयोजन भिमकन्या ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये संस्थापक अध्यक्षा रोहिणी ढवळे, उपाध्यक्षा ज्योती मोकळ, माजी नगरसेविका उल्का कांबळे, ग्राहक फाउंडेशन पुणे जिल्हा अध्यक्षा सविता सोनवणे, अद्विका फाउंडेशन अध्यक्षा नीना जोसेफ, ग्रामपंचायत सदस्या शीला वाघमारे, लिंगाळी पोलीस पाटील नीता वाघमारे, मसनेरवाडी पोलीस पाटील अश्विनी बगाडे, सामाजिक कार्यकर्त्या जयश्री माने आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या रॅलीत सर्व भिमकन्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























