Homeसामाजिक"पुढील ५० वर्षांचा विचार करून दौंडचा विकास करा” – राजेंद्र कोंढरे यांचे...

“पुढील ५० वर्षांचा विचार करून दौंडचा विकास करा” – राजेंद्र कोंढरे यांचे नवनिर्वाचित नगरसेवकांना आवाहन

वृत्तवेध मarathi : संदिप बारटक्के

दौंड – पुणे शहराचा झपाट्याने वाढत असलेला विस्तार लक्षात घेता पुणे जिल्ह्यातील तालुक्यांची ठिकाणे पुढील पन्नास वर्षांचा दूरगामी विचार करून विकसित करण्याची गरज आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांनी केवळ आपल्या वॉर्ड किंवा प्रभागापुरते मर्यादित न राहता संपूर्ण शहराच्या एकात्मिक विकासाचा दृष्टिकोन ठेवून नियोजनबद्ध प्रयत्न केले पाहिजेत, असे मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केले.

कोंढरे हे दौंड नगरपरिषदेवर नुकत्याच निवडून आलेल्या नगराध्यक्षा व नगरसेवकांच्या सत्कार समारंभात बोलत होते. दौंड शहराचा विकास करताना बकालपणा निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी नगराध्यक्षा व नगरसेवकांनी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शाखेच्या वतीने दौंड नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा दुर्गाताई इंद्रजित जगदाळे व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार रमेश थोरात, माजी नगरसेवक नंदू पवार, महासंघाचे संयुक्त सरचिटणीस गुलाबदादा गायकवाड, दत्तात्रय सावंत, वैशाली नागवडे, महेश भागवत, इंद्रजित जगदाळे पाटील, गुरुमुख नारंग, राजेंद्र खटी, नंदू जगताप, विक्रम पवार, उमेश वीर, हनुमंत गाडे, अरुणा मोरे, प्रसाद गायकवाड, आदिनाथ थोरात, सचिन कुलथे, निलेश सावंत, आनंद पळसे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे पाटील, नगरसेवक योगेश कटारिया, गटनेते जिवराज पवार व नगरसेविका स्वाती सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश काकडे, विकास जगदाळे, रोहन घोरपडे, दादा मोरे, अविनाश गाठे, प्रताप खानविलकर, शंतनु निंबाळकर, गणेश घोलप, राकेश भोसले व वैभव कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश पवार यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. दिनेश पवार यांनी केले तर आभार महेंद्र देसाई यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

error: Content is protected !!