वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ६, साठे नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व आयुष्यमान कार्ड शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये एकूण ३४० नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर १०९ नागरिकांची आयुष्यमान कार्ड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून त्यांना लवकरच कार्डचे वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन दौंड नगरपरिषदच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपनगराध्यक्षा छायाताई दीपक थोरात, प्रभाग क्रमांक ६ मधील नगरसेविका स्वाती निलेश सावंत, नगरसेवक सागर जगताप, प्रणिती शिंदे, आरोग्य सभापती कार्तिकी सोनवणे तसेच आबासाहेब वाघमारे, निलेश सावंत, दिपक सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले. डॉक्टर वर्गामध्ये डॉ. सचिन गुजर, डॉ. उज्वला जाधव, डॉ. फिलोमन पवार, डॉ. मीनल वागसकर, डॉ. जावेद तांबोळी यांनी मोलाचे योगदान देत नागरिकांची तपासणी केली.
यावेळी आबासाहेब वाघमारे, नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे व स्वाती सावंत यांनी मनोगत व्यक्त करत नागरिकांना शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले.
विशेष म्हणजे, या शिबिरात मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग नोंदवला. “साठे नगरमध्ये पहिल्यांदाच आरोग्य शिबिराचे आयोजन झाले,” अशी प्रतिक्रिया स्थानिक महिलांनी व्यक्त करत नगराध्यक्ष व नगरपालिकेचे आभार मानले.
शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व मान्यवर, डॉक्टर वर्ग, अधिकारी-कर्मचारी व नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























